Amit Securities shifting of registered office
सरबजीत ‘ब्रेन डेड’ नाही, पण...
खुशखबर! पेट्रोल प्रतिलिटर ३ रुपयाने स्वस्त
Oberoi Realty a good real estate bet
न्यायालयाच्या निरीक्षणांचा अभ्यास केल्यावरच कारवाई – पंतप्रधान
Help pours in for drunk-driving mishap
खासदार उदयनराजे ‘छत्रपती’ झाले!
मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय केले?
राज ठाकरेंची सभा होऊ देणार नाही!
काय आहे आयपीएलच्या जाहिरातींमागचे गौडबंगाल ? एवढा पैसा आयपीएलमध्येचं का ?
'ते' सूर्यवंशी नव्हतेच, घावडे होते?
सूर्यवंशी निलंबन : तरुण आमदारांच्या हट्टापुढे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचा नाईलाज
अमृतसरमध्ये तरुणीवर चालत्या मोटारीत सामुहिक बलात्कार
दिल्ली गँगरेपमधील आरोपीला हवाई दलाचा कॉल
पतीचे वा वडिलांचे नाव लावण्याची सक्ती केल्यास कारवाई
Help kills self at actor Ayushmann Khurrana's Goregaon flat
यूपीएससीचा धिक्कार, ‘राडा’ पेटणार?
पृथ्वीला सुखरूप ठेवून लघुग्रह मार्गस्थ
Workshops Organised by Manashakti Lonavale
कुंभची जबाबदारी मुसलमानाकडे का?
मुंबईत युनिनॉर कंपनीची मोबाईल सेवा बंद
वडाळा ते चेंबूर मेनोरेल प्रवासाची 'हवा-हवाई'!
Amit Securities Ltd has informed BSE that the registered office of the Company has been shifted from Flat No. 2401, 23rd Floor, B Wing, Satellite Tower, 261, Film City Road, Goregaon (E), Mumbai - 400063 to 308, D-Wing, Karen Co-op Housing Society Ltd, Opp. CIF, Near BMC Garden, Yaari Road Versova, Andheri (W), Mumbai - 400061 w.e.f. April 01, 2013.Source : BSE
Source : MoneyControl.com
पाकिस्तानच्या तुरुंगात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मृत्यूशी झुंज देणा-या सरबजीत सिंगची प्रकृती अधिकच खालावली आहे, पण तो 'ब्रेन डेड' नाही, असं त्याच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी, सरबजीत ब्रेन डेड असल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं या प्रकरणातील संशय आणखी वाढलाय. सरबजीत सिंगला 'ब्रेन डेड' घोषित केल्याचं अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष राजकुमार वेरका यांनी प्रसारमाध्यमांना कळवलं आणि एकच गहजब उडाला. सरबजीतची बहीण दलबीर कौर हिच्याशी आपलं बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, ती लवकरच भारतात परतणार असल्याचंही नमूद केलं. इतकंच नव्हे तर, डॉक्टरांनी सरबजीतच्या कुटुंबीयांकडे व्हेंटिलेटर काढण्याबाबत परवानगी मागितल्याचीही बातमी सूत्रांकडून मिळाली आणि सगळ्यांच्या नजरा लाहोरच्या जिना हॉस्पिटलकडे खिळल्या. सरबजीतची पत्नी आणि दोन्ही मुलींची काय अवस्था झाली असेल, या कल्पनेनं अनेकजण हेलावले. परंतु, काही वेळातच सरबजीतवर उपचार करणारे प्रमुख डॉक्टर, अल्लमा इक्बाल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य महमूद शौकत यांनी हे वृत्त फेटाळलं.
सरबजीतच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा झालेली नाही, किंबहुना त्याची प्रकृती अधिकच खालावलेय. पण तो 'ब्रेन डेड' असल्याचं निदान झालेलं नाही, असा खुलासा शौकत यांनी केला. त्याचा जीव वाचवण्यासाठी न्युरोसर्जन आणि फिजिशियन शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्याची काही औषधंही बदलण्यात आली आहेत. परंतु, दुस-या सीटी स्कॅनमधूनही फारशी सुधारणा दिसून आलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सरबजीत कुटुंबीयांकडून आणि डॉक्टरांकडून दोन विभिन्न प्रतिक्रिया आल्यानं त्याच्या तब्येतीविषयीचा गुंता अधिकच वाढलाय. दरम्यान, सरबजीत सिंगला माणुसकीच्या नात्याने भारतात पाठवा, या परराष्ट्र मंत्र्यांच्या आवाहनाला पाकिस्ताननं कुठलंही उत्तर दिलेलं नाही.
महागाईचे चटके सहन करीत असलेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर तीन रुपयाने कमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. दोन एप्रिललाच पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८५ पैशाने कपात झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तीन रुपयाने दर कमी झाल्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे. पुण्यामध्ये पेट्रोलचा नवा दर आता प्रतिलिटर ७०.२१ पैसे असा असणार आहे. मुंबईमध्ये नवा दर प्रतिलिटर ६९.७३ असा असेल.
Source : लोकसत्ता
Steady project pipeline, debt-free portfolio make Oberoi Realty a good real estate bet
The real estate sector continues to face a number of challenges, and this is the reason that analysts have rated as 'above estimates' the 1% net profit growth by Oberoi Realty, a Mumbai-focused builder.
Another reason for this enthusiasm is the stable operating numbers. The company's realisation increased by 8% on a quarter over quarter basis, despite a 5% fall in volume during the same period. The occupancy rate at Oberoi Mall was stable at 95%, while the occupancy for Commerz also rose marginally to 83%. Oberoi Realty also has a steady project pipeline in place. It has already received approvals for its Esquire project at Goregaon under the revised development control rules (DCR), and expects to start construction within a few weeks. The Oasis project in Worli has started and the same is expected to reach the 25% construction threshold in 2013-14 itself.
However, the Mumbai commercial real estate market is still struggling with oversupply and, therefore, the demand for Commerz II is not as robust as it was for Commerz I. To mitigate the problem, Oberoi Realty is planning to convert some of its commercial projects to residential ones, and this should provide the much-needed visibility for the coming quarters. The company is also considering foraying into other important markets. To begin with, it is planning to make an investment of Rs 150 crore in the National Capital Region, and additional investments will be on the basis of its success. This implies that success on this front should act as a major trigger for the stock.
The firm is still waiting for the environmental clearance for its Mulund project, and any news on that front can be another trigger. As of now, the strong execution history and high-end construction quality differentiate Oberoi Realty from other players. The low-cost land bank - since most of the land was acquired before the recent spiral in prices-is another positive factor for the stock. However, new land acquisition may be at a higher cost and this may dilute the cash holding and higher margins.
टीव्ही सिरियलच्या दुनियेतील आघाडीची कंपनी बालाजी टेलिफिल्मच्या ऑफिसवर आणि बालाजीच्या सर्वेसर्वा एकता कपूर यांच्या घरावर कर चुकवेगिरी केल्यानं इंन्कमटॅक्सच्या अधिका-यांनी मंगळवारी सकाळी अचानक धाड टाकली. या धाडीचे वृत्त टीव्ही-सिनेसृष्टीमध्ये अगदी वा-यासारखे पसरले आणि सगळीकडे याच घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी करणा-या बड्या कंपन्या आणि त्यांच्या मालकांवर इन्कमटॅक्स विभागाची वक्र दृष्टी पडण्यास सुरुवात झाली आहे. टीव्ही सिरियलमधील आघाडीची कंपनी बालाजी टेलिफिल्मच्या ऑफिसवर आज सकाळी साडे नऊच्या सुमारास अचानक इन्कमटॅक्स विभागाचे अधिका-यांनी धाड टाकली. ऑफिसमध्ये धाड टाकल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच एकता कपूर यांच्या घरावर धाड टाकल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली. एकता सोबतच अभिनेता जितेंद्र आणि तुषार कपूर यांच्या घरावर आणि ऑफिवरही इन्कमटॅक्स विभागाच्या अधिका-यांनी धाड टाकल्याचे कळते. दरम्यान, बालाजी टेलिफिल्म कंपनीने किती कर बुडवला आहे याचा आकाडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. तसेच या धाडीनंतर एकता, तुषार, जितेंद्र आणि बालाजी टेलिफिल्म कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया मीडियाकडे देण्यात आलेली नाही.
मी अद्याप सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांचा अभ्यास केलेला नाही. न्यायालयाने यासंदर्भात नोंदविलेल्या निरीक्षणाचा अभ्यास केल्यानंतरच योग्य ती कारवाई करू, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मंगळवारी नोंदविली. कोळसा खाणवाटप घोटाळ्याची चौकशी करणाऱया सीबीआयचा स्थितीदर्शक अहवाल कायदामंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱयांना दाखविल्याबद्दल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. राजकारण्यांचे आदेशाचे पालन करू नका, असा आदेशच न्यायालयाने सीबीआयला दिला. याच विषयावर पत्रकारांशी बोलताना डॉ. सिंग यांनी न्यायालयाच्या निरीक्षणांचा अभ्यास केल्यानंतरच यासंदर्भात कारवाई करू, असे स्पष्ट केले.
Source : लोकसत्ता
Help has been pouring in for Priyanka Rai (24), who was reduced to a vegetative state after being involved in a drunk-driving mishap in Juhu last year. A Goregaon-based chemical manufacturing company recently deposited an amount of Rs 1 lakh for Priyanka's treatment. Her father Markandaya said, "We received generous donations from several people who want to see Priyanka back on her feet or at least lead a normal life." TOI wrote about her fight to survive and how she has emerged out of her vegetative state and recently started recognizing her family and friends (April 5).
Previously, three Mumbaikars deposited Rs 27,000 in Priyanka's father Markandaya's bank account on Saturday. One of the Samaritans told TOI that he would help the family every month with Rs15, 000. Also, a samaritan had communicated to the Kokilaben Hospital in Andheri that she should be given all therapies that could help her recover completely. Markandaya said Priyanka recently got admitted to the hospital and is likely to stay there for next few weeks. Though Priyanka is fully conscious and recognizes people, she needs help eating, sleeping, sitting and standing. Kokilaben hospital doctors said she is in a fully conscious state, but complete recovery will take a while.
गणिताचा पेपर १५० ऐवजी १०० मार्कांचा
दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याबरोबरच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेच्या मार्कांमध्येही बदल केला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीची बोर्डाची परीक्षा ६५० मार्कांऐवजी ६०० मार्कांची होणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचे अपग्रेडेशन करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याला प्राधान्य दिले जात आहे. यंदा बीजगणित व भूमिती या दोन्ही विषयांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून या विषयांमधील अभ्यासक्रमाचा काही भागही वगळण्यात आला आहे. त्यामुळे या विषयांचे पेपरही कमी मार्कांचे करण्याचा निर्णय मंडळामार्फत घेण्यात आला आहे. या बदलानुसार बीजगणित व भूमिती या दोन्ही विषयांची परीक्षा प्रत्येकी ४० मार्कांसाठी घेतली जाणार असून २० मार्क इंटर्नल पद्धतीने दिले जाणार आहेत. त्यामुळे ही परीक्षा ६०० मार्कांची होणार आहे. यापूर्वी दहावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना ७५ मार्कांसाठी भूमिती तर ७५ मार्कांसाठी बीजगणिताचा पेपर द्यावा लागत होता. त्यामुळे हा विषय १५० मार्कांचा होता.
पेपर जाणार जड...
बीजगणित व भूमिती या दोन्ही विषयांच्या अभ्यासक्रमातील बराचसा भाग वगळण्यात आलेला असला तरी अभ्यासक्रमात अनेक सुधारणा केल्याने विद्यार्थ्यांना थोड्या फार प्रमाणात अवघड अभ्यासक्रमाला तोंड द्यावे लागणार आहे. तसेच मार्कही कमी करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी मार्कांसाठी जास्त अभ्यास करावा लागेल. अभ्यासक्रमातून वगळलेला भाग अन्य बोर्डाच्या अभ्यासक्रमांमध्ये नसल्यामुळे वगळण्यात आल्याची माहिती बोर्डामार्फत देण्यात आली. अभ्यासक्रमातील वगळलेल्या भागाविषयी शाळांना माहिती दिल्याचे बोर्डामार्फत सांगण्यात आले.
मंगळावरील संभाव्य वसाहत
मार्सवन हा आहे, नेदरलँडस येथीस एका कंपनीचा एरोस्पेस प्रकल्प. त्यात माणसांना 'मंगळ'वारी घडवली जाणार आहे. ना नफा संस्थेने आखलेल्या या मोहिमेत किमान चार माणसांना २०२३ पर्यंत मंगळावर नेले जाणार आहे.ही मोहिम जाहीर करून अवघे तीन दिवस झाले आहेत, या काळात जगभरातून वीस हजार अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे चीनने या संधीचा लाभ उठवण्याचे ठरवले असून त्या देशाच्या किमान ६०० धाडसी व्यक्तींनी मंगळावर जाण्यासाठी अर्जही केला आहे, जे जातील त्यांनी मंगळावर मुक्काम करणे अपेक्षित आहे व. मंगळावर सध्यातरी माणूस अगदी सहज राहू शकेल अशी परिस्थिती नाही. एकूण चाळीस जणांना मंगळावर नेऊन सोडण्याचा संकल्प यात आहे.
निवड व प्रशिक्षण
मार्सवन प्रकल्पात चाळीस उमेदवारांना मंगळावर जाण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल व नंतर मंगळावर वस्तीला पहिल्यांदा कोण जाणार हे टीव्ही प्रेक्षकांचे मतदान घेऊन ठरवले जाणार आहे. चीनच्या ६०० जणांनी मंगळावर जाण्यासाठी अर्ज केले आहेत.
चीनला भारताची भीती
चीनची सध्या तरी कुठलीच मंगळ मोहिम दृष्टिपथात नाही पण भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने मात्र मंगळाच्या दिशेने यान पाठवण्याचे ठरवले आहे. ऑक्टोबरमध्ये ही मोहिम राबवली जाणार आहे, त्यामुळे मंगळावर स्वारी करणारा भारत हा आशियातील पहिला देश ठरणार आहे. भारताच्या मार्स ऑरबायटर मोहिमेत पाच प्रायोगिक पेलोड नेले जाणार आहेत
मोहिमेची वैशिष्टय़े
मार्स वन मोहिमेत भरपूर पैसा ओतण्यात आला आहे. त्यात चांद्र मोहिमा, अंतराळ स्थानक उभारणे व तीन टप्प्यातील मंगळ मोहिमा राबवणे अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे. हे सगळे २०३० पर्यंत साध्य केले जाणार आहे. मार्सवन या मंगळ मोहिमेत दूर संवेदन, मंगळावर अलगद उतरणे, मंगळभूमीचा शोध घेणे, नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणणे ही उद्दिष्टे आहेत
मंगळवारीचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू असा आम्हाला विश्वास वाटतो. या मोहिमेसाठी पाच लाख अर्ज येतील अशी अपेक्षा आहे.
बॅस लॅन्सडोर्प - मार्सवन प्रकल्पाचे सहसंस्थापक
आझाद मैदानात जाहीर राज्याभिषेक
सातारा, रायगड व पुणे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा मंगळवारी 'महाराष्ट्राचा राजा' म्हणून प्रतिकात्मक राज्याभिषेक करण्यात आला. यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचा सातबारा उदयनराजेंच्या नावे करून त्यांच्या धटिंगणशाहीचा निषेध करण्यात आला. आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी रयत संघटनेच्या माध्यमातून आझाद मैदानात हे आंदोलन करण्यात आले. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत यावेळी उदयनराजेंच्या कारभाराची लक्तरे वेषीवर टांगणारे प्रहसन नाट्य सादर करण्यात आले. या माध्यामातून साताऱ्यात उदयनराजे शेतकऱ्यांवर करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली. शेतकऱ्यांनी या नाट्याला उत्स्फूर्त दाद दिली. शिवसेनेचे विधीमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, आमदार विनोद घोसाळकर आणि आमदार शरद पाटील उपस्थित होते.
विवेक पंडित यांनी यावेळी शेतकऱ्यांना संबोधित केले. 'आज आझाद मैदानात आपण सगळे साताऱ्यातील शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. या प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळ्यामुळे सरकारला जाग येईल आणि सरकार याप्रकरणी कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास श्रमजीवी रयत संघटना आपला लढा यापुढे अधिक आक्रमक करून सरकारकडून न्याय मिळविल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीतली ही बेकायदेशीर राजेशाही अन्यायकारक असून ती आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशपरंपरेला साजेशी नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी शिकवण शिवरायांनी दिली होती, मात्र त्यांचे आताचे वंशज याच्या अगदी विरुद्ध कृती करत आहेत. आताचे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून या विरोधात आमचा लढा अंतिम न्याय मिळेपर्यंत चालूच राहील,' असे पंडित म्हणाले.
उच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण
लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक आणि शारीरिक अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी करण्यात आलेल्या 'प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्डर्स अॅक्ट' (पोक्सो) या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आतापर्यंत काय पावले उचलली गेली वा जात आहेत हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.
पुणे येथील 'सखी' या स्वयंसेवी संघटनेने केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. 'पोक्सो'ची अंमलबजावणी करण्यात यावी आणि या कायद्याअंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती संस्थेने केली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत हा कायदा अंमलात आणण्यासाठी आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने आतापर्यंत नेमकी काय पावले उचलली आहेत हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
तत्पूर्वी, मुलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांसाठी सरकारने याआधीच विशेष न्यायालये स्थापन केल्याची माहिती सरकारी वकील रेवती ढेरे यांनी न्यायालयाला दिली. शिवाय पीडितांना नुकसान भरपाई देण्याची योजनाही आखण्यात आली असून लवकरच ती मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल, असेही ढेरे यांनी न्यायालयाला सांगितले.
वास्तविक पुण्यातील शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे यांनी एका अल्पवयीन मुलाला आपल्या फार्म हाऊसवर नेऊन तेथे मित्रांसोबत त्याचा लैंगिक छळ केल्याचा मुद्दा संस्थेने याचिकाद्वारे न्यायालयासमोर आणला आहे. तसेच जोंधळे यांच्या दबावामुळे पुणे पोलीस प्रकरणाचा योग्य तो तपास करीत नसल्याने तो सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी संस्थेने केली आहे. जोंधळे यांच्या मुलानेच हा प्रकार उघडकीस आणला. परंतु पोलिसांशी संगनमत केल्याने सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळेच प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करण्याची मागणी संस्थेने याचिकेत केली आहे.
Source : लोकसत्ता
संभाजी ब्रिगेडचा इशारा
मराठा आरक्षणाला विरोध करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने तलवार उपसली आहे. राज यांच्या भूमिकेचा निषेध करतानाच यापुढे महाराष्ट्रात राज ठाकरेंची एकही सभा होऊ देणार नाही,' असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. जळगाव येथील सभेत राज यांनी आरक्षणाच्या नावाखाली जातीयवादाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला जोरदार आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राज यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी राज यांना महाराष्ट्रात सभाबंदी करण्याचा निर्धार करण्यात आला.
मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी कधीही एकत्र न येणारे नेते मराठा आरक्षणासाठी कसे काय एकत्र येतात? राज्यात जातीच्या नावावर लोकांची डोकी भडकविण्याचे काम सुरू आहे. सत्ताधारी राजकारणी नागरिकांना जाती-पातीत विभागून निवडणुकीत मतांसाठी त्यांचा गैरफायदा घेतात. सत्ताधाऱ्यांच्या या फासात अडकू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी जळगावमधील सभेत केले होते.
इतर सर्व क्रिकेट मालिकांपेक्षा आयपीएलमध्ये जाहिरातींवर सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होते. आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी एकूण शंभर ब्रँड्स जाहिरात करारात समाविष्ट आहेत आणि त्यांना या थेट स्वरुपातील जाहिरातीतून एकूण १५०० कोटी रूपयांची उलाढाल अपेक्षित आहे. अशा प्रकारची प्रसिद्धी इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतून या ब्रँड्सना मिळत नाही. अगदी आयसीसीच्या चॅम्पियन्स लीग टी-२० पेक्षा कितीतरी पटींनी जास्त परतफेड आयपीएलच्या सामन्यांमधून होणा-या जाहिरातींतून ब्रँड्सना मिळते. याचे कारण म्हणजे, आयपीएलमध्ये खेळाडूंचा रीतसर लिलाव केला जातो त्यामुळे त्यांच्या टी-शर्टवर जाहिराती कितीही असल्या तरी खेळाडूंचा त्याला विरोध नसतो. तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये आयसीसीच्या नियमावलींप्रमाणे जाहिरातींवर काही बंधने आहेत. तितकी बंधने आयपीएलमध्ये नाहीत.
इतर क्रिकेट मालिकांपेक्षा जाहिरातींवर बंधने कमी असल्यामुळे आयपीएलसाठी जाहिरातदारांची संख्या जास्त असते. त्यामुळे संघमालकांना यावर्षी खेळाडूंच्या किटमधील एकूण दहा जागा जाहिरातदारांना विकता आल्या. यामध्ये टी-शर्टवरील छातीच्या इथला मध्यभाग, उजवा हात, डावा हात, टी-शर्टच्या मागील भाग, कॅप, हेल्मेटच्यासमोरचा आणि मागील भाग. तसेच खेळाडू वापरत असलेली जर्सी पँन्ट यावरही जाहिरातदारांना जाहिरात देण्याची मुभा असते.
आयपीएल क्रिकेट जगतातला एक आर्थिक इव्हेंट म्हणून चर्चिला जातो. त्यामुळे प्रत्येक जाहिरातदार यात सहभागी होऊ इच्छितो. अगदी प्रतिस्पर्धी जाहिरातदारसुद्धा. या सामन्यांच्या प्रक्षेपणाचे अधिकार सोनी नेटवर्ककडे आहेत आणि यावर्षी आयपीएलने सोनी नेटवर्कचा प्रतिस्पर्धी स्टार इंडियाला देखील सामन्यांच्या जाहिरातीत सामिल करून घेतले आहे. यासर्व गोष्टींमुळे बीसीसीआयला जास्त फायदा होतो आहे
Source : लोकसत्ता
सूर्यवंशींसारखा दिसणारा सुरक्षा अधिकारी
आमदाराशी अरेरावीची भाषा करणारे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सभागृहाचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत येऊन सभागृहातील आमदारांना हातवारे करीत चिडवल्यामुळेच आमदार प्रेक्षक गॅलरीकडे धावत सुटले, असे आमदारांकडून सांगण्यात आले असले , तरी प्रत्यक्षात सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत गेलेच नव्हते. हुबेहुब त्यांच्यासारखे दिसणारे विधानभवनातील सुरक्षारक्षक घावडे हे तिथे बसले होते आणि त्यामुळे सदस्यांची गल्लत झाली , अशी माहिती आता तपासणीत पुढे आली आहे.
वरळी सी लिंकवर सचिन सूर्यवंशी या अधिकाऱ्याने आपल्याशी अरेरावीची भाषा केली असे सांगत आमदार क्षितीज ठाकूर यांनी गेल्या मंगळवारी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्याला इतर आमदारांनी पाठिंबा दिला. हे सर्व सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या सचिन सूर्यवंशी यांनी आमदारांना वरूनच हातवारे करून चिडवले , असा आक्षेप घेत आमदार सूर्यवंशी यांना त्याचा जाब विचारण्यासाठी सभागृहातून धावले आणि नंतर पुढचा प्रकार घडला. या प्रकाराची विधानसभाध्यक्षांनी चौकशी सुरू केली. सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत कसे पोहोचले ,याचे कोडे मात्र उलगडले आहे. सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत गेले नव्हते. ते परिषदेच्या उपसभापतींच्या दालनाबाहेरच उभे होते. मात्र हुबेहूब सूर्यवंशी यांच्यासारखा दिसणारा घावडे नावाचा विधानभवनातील एक सुरक्षा कर्मचारी प्रेक्षक गॅलरीत बसला होता. त्याचा फोटो सूर्यवंशींच्या फोटोशी पडताळून पाहिला असता , या दोघांमध्ये थोडेफार साम्य असल्याचे दिसून आले. हा सुरक्षा अधिकारी तिथे उपस्थित असलेल्या इतरांना गॅलरीत बसण्याबाबत सूचना देण्यासंबंधी हातवारे करत होता. मात्र तो आपल्याकडे पाहूनच हातवारे करीत असल्याचे आमदारांनावाटले असावे , अशी माहिती एका ज्येष्ठ मंत्र्यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचे निलंबन झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील तरुण आमदारांनी घेतल्याने अखेर सरकारला निलंबनाचा निर्णय घ्यावा लागला. मात्र या निलंबनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा तीव्र विरोध होता. त्यातूनच विधानसभेचे अडीच दिवसांचे कामकाज वाया गेले.
आमदारांना निलंबित केल्यावर बुधवारी सायंकाळपासून उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनाही निलंबित करावे, अशी मागणी जोर धरू लागली. सरकारच्या पातळीवर काहीच निर्णय घेतला जात नव्हता. परिणामी गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस विधानसभेचे कामकाज होऊ शकले नाही. सोमवारीही सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी चापर्यंत या गोंधळात कामकाज वाया गेले. मारहाण केलेल्या उपनिरीक्षक सूर्यवंशी यांना निलंबित केल्यास चुकीचा संदेश जाईल, असा दावा केला जात होता. मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहमंत्री पाटील यांचा निलंबनास विरोध होता. पोलिसांच्या विरोधात विरोधी सदस्यांपेक्षा सत्ताधारी आमदारच जास्त आक्रमक झाले होते. काँग्रेसचे सुनील केदार, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही तरुण आमदारांनी सभागृहात सरकारची चांगलीच कोंडी केली. प्रत्येक वेळी कामकाज सुरू झाल्यावर सत्ताधारी बाकांवरूनच कारवाई कोणती केली हे आधी सांगा, अशी मागणी केली जात होती. सत्ताधारी बाकांवरील आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत घोषणा देत पुढे आले होते.
निलंबन झाल्याशिवाय कामकाज सुरू होऊ शकणार नाही याचा अंदाज आल्याने दुसरीकडे धावपळ सुरू होती. अर्थसंकल्प मंगळवारी मंजूर करणे आवश्यक असल्याने कोणत्याही परिस्थितीत कामकाज सुरू झाले पाहिजे याकडे लक्ष वेधण्यात येत होते. अखेर साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत सूर्यवंशी यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. निलंबनाची घोषणा करताना गृहमंत्री आर. आर. पाटील हे काहीसे गुश्यातच दिसत होते. सभागृहात येऊन बसले तेव्हाही त्यांचा नेहमीचा आवेश दिसत नव्हता.
Source : लोकसत्ता
* विरुद्ध दिशेच्या लोकलमधून रंग फेकला
* धावत्या ट्रेनमधून कोसळून तरुणाचा मृत्यू
* सात प्रवासी जखमी , दोन गंभीर
एकीकडे होळीनिमित्त प्रबोधनाचा आवाज घुमत असतानाच सायन स्टेशनजवळ विकृत प्रवाशांनी केलेल्या आगळीकीमुळे एका प्रवाशाला जीव गमवावा लागला. सोमवारी रात्री आठच्या सुमारास गर्दीने खच्चून भरलेल्या एका धावत्या लोकलवर सायन स्टेशनजवळ विरुद्ध दिशेच्या लोकलमधील काही जणांनी गुलाल फेकल्याने दरवाजावर उभे असलेले आठ जण खाली कोसळले. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. इतर सात प्रवाशांमध्ये एका महिलेचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
दादरवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी धीमी लोकल रात्री ७.५५ वाजता सायन स्टेशनजवळ आली असता हा अपघात झाला. या लोकलच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकलमधून अचानक गुलाल फेकल्याने दरवाज्याजवळ असणाऱ्या आठ प्रवाशांचा तोल गेला. या अपघातात जी. नित्यानंद (२६) खाली कोसळून मृत्युमुखी पडला तर इतर सात जखमी झाले.
गुलाल फेकल्यानेच प्रवासी खाली कोसळून अपघात झाल्याच्या घटनेला मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक मुकेश निगम यांनीही दुजोरा दिला. या गुलालामध्ये तिखटाचा अंश असण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
नोकरीवरून घरी परत निघालेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीवर चालत्या मोटारीमध्ये सामुहिक बलात्कार झाल्याची घटना सोमवारी रात्री अमृतसरमध्ये घडली. चार नराधमांनी बळजबरीने संबंधित तरुणीला आपल्या मोटारीमध्ये बसविले आणि तिच्यावर बलात्कार करून नंतर तिला गाडीतून फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती सोमवारी संध्याकाळी आठच्या सुमारास बसस्टॉपवर उभी होती. त्यावेळी गाडीतून आलेल्या चौघांनी तिला बळजबरीने त्यांच्या गाडीत बसविले. चौघांनी गाडीमध्येच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला गाडीतून फेकून ते चौघेही फरार झाले.
तरुणी एका मोबाईल कंपनीमध्ये काम करते. या घटनेनंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. मात्र, तिच्या अंगावर कोठेही जखमा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त हरजित सिंग यांनी संबंधित तरुणीच्या मोबाईमलधील कॉल्सचा तपास करण्यात येत असल्याचे सांगितले. घटना घडण्याअगोदर आणि घडल्यानंतर तिला एका ठराविक मोबाईल क्रमांकावरून सातत्याने कॉल येत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Source : लोकसत्ता
दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेल्या अमानुष सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एक नराधम आरोपी विनय शर्मा याची भारतीय हवाई दलात निवड झाली आहे. हवाई दलाकडून विनय शर्माला तसे पत्रच आले असून ५ एप्रिल रोजी त्याला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. नराधम विनय शर्माने बलात्काराचे भयंकर कृत्य करण्याआधी हवाई दलातील भरतीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल आता लागला असून बलात्कारी त्याची हवाई दलात निवड झाली आहे. जलद गती न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शर्माच्या वकिलाने न्यायालयाला ही माहिती दिली. हवाई दलाचे पत्र दाखवून वकिलाने आरोपी शर्माला जामीन देण्याची मागणी केली. 'शर्मा हा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बीए करत आहे. पुढील महिन्यात त्याची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे त्याला जामीन द्यावा,' अशी मागणी वकिलाने केली. दिल्ली पोलिसांनी मात्र, शर्माला जामीन देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
राज्याच्या नव्या महिला धोरणातील शिफारस
समाजात अर्धी लोकसंख्या महिलांची असली तरी त्यांना अजून पाव टक्काही अधिकार मिळालेले नाहीत. अगदी विवाहित महिलेने पतीचेच आडनाव का लावावे, मुलांनी पालक म्हणून आईचे नाव का लावू नये, म्हणजे नाव कुणाचे लावावे, याची निवड करण्याचाही अधिकार महिलांना नाही. मात्र आता हा हक्क त्यांना मिळणार आहे. महिलांना पतीचे वा वडिलांचे नाव लावण्याची सक्ती करता येणार नाही. तसे केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून राज्याच्या नव्या महिला धोरणात तशी शिफारस करण्यात आली आहे.
राज्याचे तिसरे महिला धोरण तयार झाले असून ८ मार्चला जागतिक महिला दिनी त्याचा मसुदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात येणार आहे. परंपरा आणि प्रस्थापित व्यवस्थेला सौम्य धक्के देणारे हे महिला धोरण आहे. शाळेचा दाखला असो अथवा नोकरीसाठी करावयाचा अर्ज असो वा कुठलेही सरकारी कागदपत्र असो, त्यात नावाची नोंद करताना फक्त पती किंवा वडील यांचाच पर्याय दिलेला असतो. त्याला महिला धोरणाने छेद देणारी शिफारस केली आहे. महिलांना व मुलांना पतीचे की वडिलांचे नाव लावायचे, याची निवड करण्याचा अधिकार हवा. एखाद्या मुलाला किंवा मुलीला फक्त आईचेच नाव लावायचे असेल तरी तशी त्याला परवानगी असली पहिजे आणि सरकारी कागदपत्रांमध्ये तसा नवीन रकाना तयार केला पाहिजे. महिलांना कुठले नाव लावायचे याचे स्वातंत्र्य नाकारल्यास त्याबद्दल थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची व त्यावर कारवाई करण्याची शिफारस महिला धोरणात करण्यात आली आहे. तंटामुक्ती गाव योजनेत स्त्रियांवरील हिंसाचाराच्या व अत्याचाऱ्यांच्या गुन्ह्य़ांचा समावेश करू नये, अशी स्पष्ट सूचना महिला धोरणाने केली आहे. गर्भवती महिलेची एचआयव्ही चाचणी केली जाते. मात्र यापुढे तिच्या पतीचीही अशी चाचणी करणे बंधनकारक करावे, असे सुचविले आहे.
लैंगिक शिक्षणाचाही आग्रह
शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना महिलांच्या हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. लैंगिक जीवन म्हणजे काही तरी गूढ आहे, असे मुलांना वाटते. त्यातून काही विकृत घटना घडतात, त्याला आळा घालण्यासाठी योग्य वयातच मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले पाहिजेत, याचाही आग्रह महिला धोरणात धरण्यात आला आहे.
Source : लोकसत्ता
Actor Ayushmann Khurrana’s domestic help was found hanging in his first floor apartment at Anmol Pride, Goregaon (W) on Sunday night. API Arvind Pawar, investigating officer of Goregaon police, said the deceased, Rudraprasad Kafle, was seen last with the actor’s driver on February 28. “In the afternoon, the driverand Kafle left together to collect a pay cheque. The driver also dropped him back home in the evening,” Pawar added. The 26-year-old domestic help has been working for the Khurrana family for the past five years. He used to live in their house. The actor and his family have been away for the past one month.
The incident came to light on Sunday, when a foul smell started emanating from the actor’s apartment. “As the house was locked from inside, the secretary of the building called the actor, who gave them permission to enter the house,” said a security guard at the society. A housekeeper was then asked to use a ladder to look through the apartment window. When he saw Kafle’s body hanging from the ceiling fan, the police were informed. Pawar added, “We rushed to the spot and with the help of a keymaker, unlocked the front door in the presence of neighbours. We found Kafle’s body hanging from the fan.”
The post-mortem report has revealed that Kafle committed suicide at least 2-3 days before his body was found. The police have not found any suicide note. Pawar said, “There were talks of his marriage going on at his village in Nepal. Some disagreement over it could have prompted him to do this.” Ayushmann, who is still in Delhi, said, “It is very unfortunate and I’m saddened by the news of Kafle committing suicide.”
Source : DNA India
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचे पेपर मराठी भाषेतून लिहिता येणार नाहीत, सर्व पेपर इंग्रजी किंवा हिंदीतूनच लिहावे लागतील, असं फर्मान केंद्रीय लोकसवा आयोगानं काढल्यामुळे मराठीप्रेमी खवळले असून या भूमिकेविरोधात मोठा 'राडा' होण्याची चिन्हं आहेत. यूपीएससीच्या मराठीद्वेषाचा शिवसेनेनं धिक्कार केलाय आणि ही अट मागे न घेतल्यास महाराष्ट्रात परीक्षा होऊ न देण्याचा इशारा दिलाय. त्यांच्यापाठोपाठ आता मनसेकडूनही लोकसेवा आयोगावर हल्लाबोल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या अभ्यासक्रमात आणि वर्षानुवर्षं चालत आलेल्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल केले आहेत. 'रट्टा' मारून पास होणा-या उमेदवारांऐवजी, अधिकाधिक कुशल प्रशासकीय अधिकारी घडवण्याच्या दृष्टीनं त्यांनी विषयांची व्याप्ती वाढवण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. परंतु, परीक्षा पद्धतीत बदल करताना त्यांनी प्रादेशिक भाषांचा पर्याय काढून टाकलाय. या नव्या नियमांनुसार, मुख्य परीक्षेत इंग्रजी वगळता अन्य सर्व पेपर केवळ इंग्रजी किंवा हिंदीतून लिहिता येतील. उमेदवाराचे पदवीपर्यंतचे शिक्षण अन्य भारतीय भाषेतून झाले असेल, तरच त्यांना त्या भाषेतून उत्तरे लिहिण्याची मुभा आहे . शिवाय, एखाद्या प्रादेशिक भाषेतून परीक्षा देणारे किमान २५ विद्यार्थी असणेही आवश्यक आहे. याचा फटका मराठी भाषक उमेदवारांना बसणार असल्यानं मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शिवसेना-भाजपनं यूपीएससीच्या या भूमिकेचा तीव्र निषेध केलाय. सर्व प्रादेशिक भाषांमध्ये यूपीएससी परीक्षा झाली पाहिजे, असं आग्रही मत भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलंय. शिवसेनेनं तर मराठीचा मुद्दा आयताच मिळाल्यानं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठी भाषा वगळून महाराष्ट्रात यूपीएससीची परीक्षा घेऊन तर दाखवा, असं खुलं आव्हानच त्यांनी दिलंय. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेटही घेणार आहेत. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीनं या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन केल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे, किंबहुना आदेशाकडे कान देऊन बसलेत. महाराष्ट्रातल्या नोकरीवर पहिला अधिकार मराठी माणसाचाच आहे, अशी ठाम भूमिका राज यांनी मनसेच्या स्थापनेपासून घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेच्या अगदी उलट भूमिका केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेय. अमराठी उमेदवारांच्या, विशेषत्वानं उत्तरेकडील तरुणांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्यानं मनसेचे मराठमोळे कार्यकर्ते भडकलेत. मराठी वगळलीत, मग हिंदीही वगळा, फक्त इंग्रजीतच पेपर लिहिण्याची परवानगी द्या, नाहीतर मराठीही वगळू नका, असं त्यांनी ठणकावलंय. त्यामुळे येत्या काळात, यूपीएससीविरोधात मनसेही रस्त्यावर उतरल्यास मोठा भडका उडू शकतो. यूपीएससीची परीक्षा देऊ इच्छिणा-या राज्यभरातील तरुणांनीही, मराठीचा पर्याय हद्दपार केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भूमिकेमुळे आयएएस, आयपीएस, आयआरएस या पदांवर वरिष्ठ अधिकारी म्हणून परप्रांतीय तरुणच अधिक दिसतील, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनीही यूपीएससीच्या या चमत्कारिक नियमावर टीका केली आहे.
दीडशे फूट म्हणजे फुटबॉल मैदानापेक्षा थोडा कमी आकाराएवढा बहुचर्चित लघुग्रह शुक्रवारी उशिरा पृथ्वीजवळून गेला, परंतु त्यात अपेक्षेप्रमाणे पृथ्वीला काही हानी झाली नाही. २०१२ डीए १४ असे या लघुग्रहाचे नाव असून तो आपल्या पृथ्वीच्या १७,२०० मैल अंतरावरून गेला. गेल्या शतकभराच्या काळात कुठलाही अवकाशीय घटक पृथ्वीच्या इतका जवळून गेला नव्हता. दरम्यान योगायोगाचा भाग म्हणजे हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाण्याच्या अगोदर रशियाच्या उरल प्रांतात उल्केचा अवकाशात स्फोट झाला व तो अशनीच्या रूपात खाली कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत १२०० जण जखमी झाले आहेत.
खगोलशास्त्रज्ञ काय म्हणतात?
नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, उल्केच्या स्फोटाचा लघुग्रहाशी काही संबंध नाही. कारण उल्का व लघुग्रह एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रवास करीत होते. ऑस्ट्रेलिया व जगातील काही वैज्ञानिकांनी शुक्रवारी उशिरा २०१२ डीए १४ हा लघुग्रह रात्रीच्या स्वच्छ आकाशातून जाताना पाहिला व ते आनंदाने हरखून गेले. कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे पृथ्वी निकट पदार्थ शोधन कार्यक्रमाचे प्रमुख पॉल चोडस यांनी सांगितले की, हा लघुग्रह आपल्या मार्गाने गेला. आपले दळणवळण व हवामान उपग्रह हे २२,३०० मैल उंचीवर असतात, त्यापेक्षाही जवळून हा लघुग्रह गेला. तो नुसत्या डोळ्यांनी दिसणारा नव्हताच. त्याची प्रकाशमानता ७.० होती. साधारणपणे ६.० प्रकाशमानतेचा पदार्थ हा साध्या डोळ्यांनी दिसू शकतो. रशियात ज्या उल्केचा स्फोट झाला ती ४९ फूट रुंद व ७००० टन वजनाची होती. उल्केचा आकार हा लघुग्रहाच्या एकतृतीयांश इतकाच होता.
ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार?
नासाच्या ग्रहीय विज्ञान विभागाचे संचालक जिम ग्रीन यांनी सांगितले की, उल्केचा स्फोट व नंतर लघुग्रह पृथ्वीजवळून जाणे या पाठोपाठच्या घटना ऐतिहासिक व दुर्मीळ होत्या. लघुग्रहाची लांबी फुटबॉल मैदानाच्या निम्मी होती, तर स्फोट झालेल्या उल्केची लांबी १५ यार्ड होती. नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, साधारण चाळीस वर्षांतून एखादा मोठा अवकाशस्थ लघुग्रह किंवा काही वेळा उल्का पृथ्वीनिकट येतात व तो आदळण्याची शक्यता बाराशे वर्षांतून कधीतरी असते.
Source : लोकसत्ता
"Mendukranti Karyashala" on 19th February, 2013. This workshop is in Marathi. This workshop is specially designed for the parents having children in the age group of 1 to 7 years (Children not allowed). This workshop helps you to develop a sharp intellect and a virtuous character in your child. Give guidance about how to establish balance in your child temperament, behaviour, personality; improve various capabilities and for the kids overall development.
Duration : 6 Hours (Time: 10.00 A.M. To 4.00 P.M.)
Donation Contribution: Rs. 300/- per person.
Venue : RAJPURIYA SABHAGRAHA, ASMITA BHAVAN, WE HIGHWAY, JOGESHWARI(EAST), MUMBAI - 400 060.
Enrollement started.
GARBHASANSKAR KARYASHALA in our Centre on 3rd March, 2013.
Features
• Latest scientific evidences about learning, memory, etc. of the fetus
• Multimedia : Nine Months Miracle
• Video : Developmental Stages of the Fetus
• Effect of Mantra and Music on the Fetus
• Individual Pulse-rate Based Test of the Couple
• Prenatal Education Exhibition
• Diet, Yoga, Music, Prayer, Concentration etc.
Participants : Only pregnant couples (in all months of pregnancy).
Language : Marathi,
Duration : 6 hours.
Donation Contribution: Rs. 600/- per pregnant couple, between 1 and 9 month of pregnancy. (Same charges apply for single person.)
Venue : RAJPURIYA SABHAGRAHA, ASMITA BHAVAN, WE HIGHWAY, JOGESHWARI(EAST), MUMBAI - 400 060.
Enrollement started.
Shubhangi Lavande - Sadhak, Goregaon_Jogeshwari kendra, Cel. : 99675 00748
अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आता हिंदू संघटना व उत्तर प्रदेश सरकारमध्ये वादाचा अग्नीकुंड धगधगू लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या कुंडात प्रथमच जाहीरपणे तेल टाकले असून कुंभमेळ्याची जबाबदारी मुसलमान मंत्र्याकडे का दिली, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने ज्येष्ठ मंत्री आझम खान यांच्याकडे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली आहे. कुंभमेळ्याती चेंगराचेंगरीनंतर खान यांनी कुंभमेळ्याच्या प्रभारीपदाच राजीनामा देऊ केला होता. मात्र, अखिलेश यादव सरकारने तो नाकारला असून त्यांनाच काम पाहण्यास सांगितले आहे. अखिलेश सरकारच्या या निर्णयावर संघाचे मुखपत्र असलेल्या ' ऑर्गनायजर ' मधून टीका करण्यात आली आहे.
अलाहाबाद स्टेशनवरील चेंगराचेंगरीबद्दल ' ऑर्गनायजर ' च्या संपादकीय लेखात उत्तर प्रदेश सरकारवर बेफिकीरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाची धुरा मुसलमान मंत्र्याकडे सोपवण्याचा हट्ट का, असा सवाल करण्यात आला आहे. ही जबाबदारी हिंदू मंत्र्याकडे असती तर चेंगराचेंगरी झाली नसती असे नाही. मात्र, किमान एखाद्या चांगल्या मंत्र्याला ही जबाबदारी देणे गरजेचे होते. महाकुंभ मेळा राज्याला कोट्यावधींचा महसूल देतो. अशा महत्त्वाच्या समारंभाबद्दल राज्य सरकारने उदासिनता दाखविता कामा नये. तीर्थयात्रेचे महात्म्य जाणणाऱ्या व त्याप्रती समर्पण भाव असलेल्या मंत्र्याकडेच ही जबाबदारी सोपविली जाणे आवश्यक आहे. आझम खान यांच्याकडे या सगळ्याचा अभाव आहे, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे. संघाच्या या भूमिकेमुळे अखिलेश सरकार व हिंदू संघटनांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.
टूजी घोटाळ्यानंतर देशातील अनेक कंपन्यांचे टूजी परवाने रद्द करण्यात आले होते. त्याचा सर्वात मोठा फटका युनिनॉर कंपनीला बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युनिनॉरने आपली मुंबईतील सेवा बंद केली आहे. कंपनीतर्फे सेवा बंद केल्याचे संदेश युनिनॉरधारक ग्राहकांना पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, कुठलीही आगाऊ नोटीस न देता हा निर्णय घेण्यात आल्यामुळे मुंबईतील युनिनॉरच्या जवळपास अठरा लाख ग्राहकांना याचा फटका बसला आहे.
ज्या कंपन्याचे टूजी परवाने रद्द करण्यात आले आहेत आणि ज्यांना नवीन परवाने मिळालेले नाहीत, अशा कंपन्यांना आपली सेवा बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते, त्यानुसार युनिनॉरची सेवा बंद करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांकडे फक्त युनिनॉर कंपनीचेच सिम कार्ड आहे आणि जे व्यावसायिक कामासाठी युनिनॉरची सेवा वापरतात त्यांना या अचानक घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. नवीन सिम कार्ड विकत घेऊन सर्व कागदपत्रांची पुर्नपडताणी करण्यास कमीतकमी तीन-चार दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे पुढील साधारण एक आठवडा युनिनॉर ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. युनिनॉरच्या या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
Source : लोकसत्ता
नवी मुंबईतील एसके ब्रदर्स बिल्डर्सचे सुनीलकुमार लाहोरीया यांच्या हत्येप्रकरणी आज सकाळी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी इमॅन्युएल अमोलिक यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत सुनीलकुमार यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे कुटुंबियांनी सांगितले. सुनीलकुमार यांची काल वाशीच्या सेक्टर २८ मध्ये अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हंटर सेक्युरीटीच्या वेशात आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी हे कृत्य केले होते. यातील अटकेत असलेल्या व्यंकटेश शेट्टीयार या मारेकऱ्याने दिलेल्या माहितीवरून या हत्येच्या मूळाशी जाण्यासाठी पोलीस वेगाने तपास करत आहेत. याप्रकरणी मोबाईलवरील संभाषणात अमोलिक यांचे नाव समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
अमोलिक हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस अधिकारी आहेत. पोलीस दलात ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे. ४० गुंडांचे एन्काऊंटर्स त्यांच्या नावावर आहेत. मात्र एका फेक एन्काऊंटरमुळे तसेच अंडरवर्ल्डशी संबंधांच्या संशयावरून त्यांना निलंबित करण्यात आले होते. उल्हासनगरमधील गोपाल राजवानी गँगचा गुंड बबन कोयंडे याला १९९२ मध्ये चकमकीत मारण्यात आले होते. ही चकमक बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने सीआयडीने २००३ मध्ये अमोलिक यांना अटक केली होती. आता सुनीलकुमार यांच्या हत्येने अमोलिक पुन्हा एकदा नव्या प्रकरणात अडकले आहेत. सुनीलकुमार यांच्या हत्येचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी आहेत का? त्यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती का? याचाही शोध पोलीस घेत आहेत.
अनेक बडे बिल्डर चौकशीच्या फेऱ्यात
सुनीलकुमार यांच्या हत्येमागील कारण अद्यापी गुलदस्त्यात असले तरी जमीनाच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबईत सध्या विमानतळामुळे जमीनीला सोन्याचा भाव आला आहे. आठवडाभरापूर्वीच उलवेतील जमीनीसाठी सिडकोच्या क्लार्कची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे सुनीलकुमार यांच्या हत्येमागेही जमीनीचा वादच असण्याची शक्यता बळावलीय. त्यादृष्टीने अनेक बिल्डर्सही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सुनीलकुमार यांचे भाऊ संजीव हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून नवी मुंबई पालिकेच्या शिक्षण मंडळावर सदस्य आहेत. त्याअनुशंगानेही तपास केला जात आहे.
* सरकारी कर्मचारी, शिक्षक संपापासून दूर
* रेल्वे, रिक्षा, टॅक्सी बेस्ट सुरू राहणार
राज्यात २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा विचारात घेऊन राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहुतांश संघटनांनी २० व २१ फेब्रुवारीला पुकारण्यात आलेल्या संपापासून दूर राहण्याचे ठरविले आहे. याच मुद्यावर रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, एसटी व बेस्टच्या कामगार संघटनांनीही संपात सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. शिक्षक संघटनांचाही संपाला विरोध आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील संघटना मात्र संपात सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून आयटक, सिटू, इंटक व बीएमएस या राष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी २० व २१ फेब्रुवारीला दोन दिवसांच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. या संघटनांशी संलग्न तसेच शिवसेनाप्रणित कामगार संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला होता, परंतु संपाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून बहुतांश संघटनांनी संपातून माघार घेण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारला तीन आठवडय़ांपूर्वी संपाची नोटीस दिली होती, त्याचे साधे उत्तरही दिले गेले नाही. सरकार बेजबाबदार आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी ठरल्याप्रमाणे संपावर जाणारच असे र. ग. कर्णिक यांनी सांगितले. बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला तर त्याची जबाबदारी सरकारची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अन्य संघटनांनीही संपात सहभागी व्हायचे नाही, असे ठरविले आहे. महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाने वेतनेतर अनुदानासाठी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी हा बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले आहे.
संपात यांचा सहभाग नाही..
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, एसटी कामगार काँग्रेस, नॅशनल मजदूर युनियन व सेंट्रल मजदूर युनियन, शरद राव यांची संघटना (फक्त २१ रोजी), महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसद, शिक्षक भारती.
सेना-भाजपचा विद्यार्थ्यांना दिलासा
दरम्यान, या संपात शिवसेना उतरणार असली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. संपकाळात नागरी वाहतूक सुरळीत सुरू राहील याची खबरदारी शिवसेना घेईल, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे तर कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे असले तरी विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित करणाऱ्या या बारावीच्या परीक्षेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी भाजप घेईल, असे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सांगितले.
Source : लोकसत्ता
गॅस सिलिंडरच्या सबसिडीपासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अत्यावश्यक आहे , असा फतवा केंद्र सरकारची विविध खाती , मंत्रालये जारी करत असतानाच , दुसरीकडे ' आधार ' सक्तीचे नव्हे , तर ऐच्छिक असल्याचा जाहीर खुलासाच ' आधार ' च्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आला आहे. यामुळे ' आधार ' काढणे गरजेचे आहे की नाही , याबाबतच शंका निर्माण झाल्या आहेत.
मतदानासाठी आता सरकारी चिठ्ठी
http://uidai.gov.in या वेबसाइटवरील उजव्या बाजूला असलेल्या ' व्हॉट इज आधार ' या लिंकवर या कार्डाबद्दल माहिती आहे. त्यात स्वच्छ शब्दांत लिहिले आहे की , ' हे कार्ड ऐच्छिकच आहे! ' प्रत्येक सरकारी अनुदान व कागदपत्रांसाठी ' आधार ' ची सक्ती करणाऱ्या व नागरिकांना लांबलचक रांगेत उभे करणाऱ्या सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे , असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे.
मग ही सक्ती कशाला ?
शिष्यवृत्ती, सरकारी कल्याणकारी योजना, गॅस सिलिंडरवर अनुदान, खतांवरील अनुदान, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन
* दीड तासांचा प्रवास अवघ्या १६ मिनिटांत
* गाडीची क्षमता ४८० प्रवासी वाहून नेण्याची
* गुलाबी रंगांची चार डब्यांची गाडी
* याच वर्षी ऑगस्टपासून प्रवाशांना लाभ घेता येणार
दुपारी साधारण दीडचा सुमार. बाहेर वातावरणामध्ये उकाडा असला तरी उंचावर वारा वाहत असल्याने उकाडा जाणवत नव्हता. साधारणपणे चार मजली इमारतीच्या उंचीवरून प्रवास करत चेंबूरला जाण्याची सर्वांनाच ओढ लागली होती. अखेर गाडीने शिट्टी नव्हे हॉर्न वाजवला आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात देशातील पहिल्या 'मोनोरेल'चा वडाळ्याहून चेंबूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
अवघ्या १६ मिनिटांमध्ये वळणावळणाने आजूबाजूच्या राष्ट्रीय रासायनिक आणि खत प्राधिकरण, भारत पेट्रोलियमचा गॅस भरण्याचा प्रकल्प, माहुलगाव आणि लवकरच मुंबईच्या वाहतुकीचा कणा बनणारा मुक्त पूर्व महामार्ग पाहात वडाळा ते चेंबूरचा प्रवास पार झालाच पण आजूबाजूच्या इमारतींमधून आणि खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या चेंबूरकरांच्या आश्चर्याच्या नजरा आणि उंचावलेल्या हातांना प्रतिसाद देत हा प्रवास कधी पूर्ण झाला हेही कळले नाही.
वडाळा येथे प्रतीक्षा नगरच्या मागील बाजूस असलेल्या मोनो रेलच्या डेपोमधून गुलाबी रंगाची चार डब्यांची गाडी वडाळा डेपो मोनो रेल्वे स्थानकामध्ये उभी राहिली आणि एका नव्या वाहतूक पर्वाला आरंभ झाल्याची जाणीव सर्वांनाच झाली.
अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यातून प्रवास नेमका कसा होणार आहे आणि कोणता अनुभव मिळणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. एका डब्यामध्ये १२० प्रवासी क्षमता असलेल्या चार डब्यांच्या या गाडीमध्ये छायाचित्रकार आणि पत्रकार यांच्यासमवेत 'एमएमआरडीए'चे आयुक्त राहुल अस्थाना, सहआयुक्त आश्विनी भिडे, राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया आदी मान्यवरही या प्रवासात सहभागी झाले होते.
वडाळा डेपो, भक्ती पार्क, मैसूर कॉलनी, भारत पेट्रोलियम, फर्टिलायझर टाऊनशीप, व्हीएनपी-आरसी मार्ग जंक्शन आणि चेंबूर अशी या मार्गावर असलेली स्थानके अद्याप पूर्ण तयार नसली तरी किरकोळ कामेच राहिली असल्याचे दिसत होते. गाडी सुरू झाली तशी सर्वांच्या मनातल्या भीतीयुक्त उत्सुकता पराकोटीला पोहोचली होती. एका हाताने गाडीतील हॅण्डल पकडून किंवा बाजूचा स्टील बार पकडून प्रत्येकजण आजूबाजूला जणू एखादे नवे शहर पाहावे तसा नेहमीचाच परिसर पाहत होते.
सगळा परिसर वेगळाच दिसत होता. वाढती वस्ती आणि गर्दी वेगळी भासत होती. गाडी वळण घेत असताना एसेल वर्ल्डमधल्या रोलर कोस्टरची तर सरळ जात असताना बसणारे हादरे रस्त्यावरील एसटीच्या प्रवासाची आठवण करून देत होती.
सगळ्यांच्या नजरा दोन्ही बाजून दिसणारा वडाळा ते चेंबूरचा परिसर न्याहाळत होत्या. आजूबाजूच्या शाळांमधून आणि इमारतींच्या गच्चीमधून अनेकजण हात हलवत उभे होते. एका ठिकाणी तर रस्त्यावरील लोकही काही क्षण थांबून गाडीचा हा प्रवास पाहत होते.
वडाळा ते चेंबूर हा आठ किमीचा प्रवास त्याच मार्गाने रस्त्यावरून जाताना किमान एक ते दीड तास लागत होता आता हाच प्रवास अवघ्या १६ मिनिटांत होणार हीच नव्या वाहतुकीच्या पर्वाची नांदी ठरणार आहे.
किमान भाडे आठ रुपये
सुमारे २० किमी वेगाने जाणाऱ्या या गाडीतून एकावेळी ४८० प्रवासी प्रवास करू शकतात. आठ ते २० रुपये इतके संभाव्य भाडे असणाऱ्या मोनो रेलचा पहिला टप्पा (वडाळा ते चेंबूर) ऑगस्ट २०१३ पर्यंत पूर्ण होणार असून ऑगस्ट २०१४ मध्ये संपूर्ण रेल्वे मार्ग (चेंबूर ते जेकब सर्कल) प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती आयुक्त राहुल अस्थाना यांनी दिली.
या गाडीचा वेग किमान २० तर कमाल ३२ किमी प्रति तास इतका असेल. या गाडीला ट्राम वे कायदा लागू असेल आणि निवृत्त रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या गाडीच्या प्रवासाला सुरक्षा प्रमाणपत्र घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोनो आरंभ
मोनोरेलने शनिवारी राष्ट्रीय रासायनिक आणि खत प्राधिकरण, भारत पेट्रोलियमचा गॅस प्रकल्प, माहुलगाव आणि लवकरच मुंबईच्या वाहतुकीचा कणा बनणारा मुक्त पूर्व महामार्ग पाहात वडाळा ते चेंबूरचा प्रवास पूर्ण केला. आणि मुंबईत मोनोरेल पर्वाची नांदी झाली.
वैशिष्टय़े काय?
चार डब्यांच्या या गुलाबी राणीद्वारे दीड तासांचा प्रवास अवघ्या सोळा मिनिटात होणार. गाडीचा वेग ताशी २० ते ३२ किमी आहे. त्यात एकावेळी ४८० प्रवासी बसू शकतात.
कोणती कामे शिल्लक?
वडाळा डेपो, भक्ती पार्क, मैसूर कॉलनी, भारत पेट्रोलियम, फर्टिलायझर टाऊनशीप, व्हीएनपी-आरसी मार्ग जंक्शन आणि चेंबूर अशी या मार्गावर असलेली स्थानके अद्याप पूर्ण तयार नसली तरी त्यांची किरकोळ कामेच राहिली आहेत.
फायदा काय?
वडाळा ते चेंबूर हा आठ किमीचा प्रवास त्याच मार्गाने रस्त्यावरून जाताना किमान एक ते दीड तास लागत होता आता हाच प्रवास काही मिनिटांच्या टप्प्यात आलाआहे. ही नव्या वाहतुकीच्या पर्वाची नांदी ठरणार आहे.
Source : लोकसत्ता