Bookmark and Share

 

एखादी सकाळ...

एखादी सकाळ...

 

एखादी सकाळ अशी असावी...
उठताना सुरेल भूपाळी ऐकण्यास मिळावी,
बायको बनून प्रेयसीच समोर यावी,
अचानक ऑफिसला सुट्टी मिळावी,
रात्रीचा आळस झुगारून सकाळ हसावी...


एखादी दुपार अशी असावी...
जेवणाच्या ताटात आमरसाची वाटी दिसावी,
वामकुक्षी घेताना मंद वा-याची झुळूक यावी,
चहाच्या घोटासोबत हाती कादंबरी असावी,
घरून निघताना 'लवकर या' अशी प्रेमळ मागणी असावी...


एखादी सायंकाळ अशी असावी...
ऑफिस मधून लवकर सुटका व्हावी,
रस्त्यावर अजिबात गर्दी नसावी,
अंगणात पोरांची दंगा-मस्ती असावी,
खिडकी मध्ये व्याकूळ नजर दिसावी...


एखादी रात्र अशी असावी...
सुरेल गाण्याची छान मैफल बसावी,
झोपण्याआधी 'रातराणी' फुलावी,
गोड शब्दांना खळाळती दाद मिळावी,
'सर्वस्वा'ची भेट दोघांनाही मिळावी..

 


- मंदार पानवलकर

आपला अभिप्राय - Leave a Reply

  

Banner Advertisement